कन्नड रक्षण वेदिकेचे भीमा शंकर यांनी समिती नेत्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य ताजे असतानाच कर्नाटकाचे माजी शिक्षण मंत्री व निधर्मी जनता दलाचे नेते बसवराज होरट्टी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां बाबत गरळ ओकली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे तर उपदव्यापी ठाकरे अशी टीका कर्नाटकचे माजी मंत्री आणि निजद नेते बसवराज होरट्टी यांनी केली आहे.सीमाप्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असेही होरट्टी म्हणाले.
बेळगावात म्हादइ बाबत आंदोलन करण्यासाठी सभा घेण्यासाठी बेळगावात आले होते.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.बेळगावचे खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी सिमप्रश्नाबाबत बोलत नाहीत.म्हादइ असो किंवा सीमाप्रश्न या बाबत राज्याच्या हितासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे.सीमाप्रश्नाच्या बाबत दोन मंत्री नेमून सरकारने योग्य ती पावले उचलायला पाहिजेत. मी भाजपात जाणार म्हणून चार वर्षे झाली चर्चा सुरू आहे .येडीयुरप्पा यांनी दोन वेळा भाजपात येण्याचे आमंत्रण दिले होते पण मी निजद सोडून कुठे जाणार नाही असेही होरट्टी म्हणाले.
म्हादाई असो किंवा बेळगाव सीमा प्रश्न दोन्ही बाबत कर्नाटक सरकारने राज्याच हित बघावं यासाठी पुढाकार घ्यावा .म्हादाई बाबत तर कर्नाटकावर अन्याय झाला आहे यावर राजकारण नको आम्हांला न्याय हवा अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे.
या विषयावर शेतकरी एकवटलेत, कन्नड संघटनांचा पाठिंबा आहे चार जिल्ह्यातील 14 तालुक्यात सभा करणार आहोत व आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहोत मगच मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार आहोत.असेही त्यांनी स्पष्ट केलं.