टी व्ही सेंटर एक्साईज कवाटर्स जवळ असलेल्या बेकायदेशीर होत असलेली झाडांची कत्तल जागरूक नागरिकांनी थांबवली आहे.
टी व्ही सेंटर मधील एकसाईज कवाटर्स मध्ये झाडांची होत असलेली वृक्ष तोडी ध्यानात येताच भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे सुजित मूळगुंद व सचिन जाधव प्रशांत नाईक यांनी झाडे तोडणाऱ्याना जाब विचारला त्यावेळी त्यांनी थातूर मातूर उत्तरे दिली पोलिसांना व वन खात्याला संपर्क करे पर्यंत एक टेम्पो लाकूड घेऊन पलायन केले. या बेकायदेशीर वृक्ष तोडी विरोधात ए पी एम सी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
यावेळी लाकूड चोर एक टेम्पो भर लाकूड होईल इतकी झाडे पाडविण्यात आलो आहेत तर आणखी भरपूर झाडं तोडण्याच्या प्रयत्नात होते.यावर आळा घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
दिवसा ढवळ्या होतअसलेल्या वृक्ष तोडीला कोण जबाबदार आहे वन खाते का गप्प आहे एकसाईज खात्याचा या वृक्ष तोडीला पाठिंबा आहे का?असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
दिवसा ढवळ्या झाडांची कत्तल करणे कितपत योग्य आहे?शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा बेकायदेशीर प्रकार सुरू आहे.आम्ही याविरोधात तक्रार दाखल केली आहे लाकडे चोरूण्यासाठी झाडांची कत्तल करणे कितपत योग्य आहे याविरोधात आवाज उठवणार व पर्यावरण विरोधी लोकांना धडा शिकवणार अशी भूमिका भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मूळगुंद यांनी दिली आहे