के एल एस संस्था आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात समन्वय करार झाला असून या करारामुळे संस्थेच्या मेकॅनिकल आणि एरोनॉटिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना एच ए एल मध्ये प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती के एल एस चे कार्याध्यक्ष अनंत मंडगी यांनी लॉ कॉलेजच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला संस्थेचे चेअरमन प्रदीप सावकार ,जी आय टी च्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष एम.आर.कुलकर्णी उपस्थित होते.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने मेकॅनिकल आणि एरोनॉटिकल शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दोन आठवड्याचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला असून प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे विमानाची ,हेलिकॉप्टरचीदुरुस्ती,देखभाल कशी केली जाते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
एच ए एल बरोबर समन्वय करार केलेली के एल एस ही देशातील एकमेव संस्था असून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी देखील याचा उपयोग होणार आहे.
सचिव विवेक कुलकर्णी, सदस्य आर.एस.मुतालिक,उदय कालकुंद्रीकर,राज बेळगावकर ,जी आय टी चे प्राचार्य डी. ए.कुलकर्णी आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.