निष्पाप सहा वर्षाच्या बालिकेवर गावातील नराधमाने बलात्कार केल्याच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी 13 रोजी कडोली बंदची हाक देण्यात आली आहे.
कडोली येथे चावडी समोर गुरुवारी सायंकाळी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकी हा कडोली बंदचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सदर बैठकीत संबंधित बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली. त्याच प्रमाणे गावात यापुढे असे गैरप्रकार निंद्य प्रकार घडणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने काय करता येईल त्यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली बैठकीस ग्रामस्थ आणि युवक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. कडोली गावात शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात बरोबरच त्या नराधमाला कठोर शासन करावे या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला. बैठकीत ग्रामस्थांनी गावात घडलेल्या अत्याचाराच्या नींद घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी काकती पोलिसांनी गावात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
*एनएफआयडब्ल्यूने उठविला आवाज*
दरम्यान आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिव अरुणा सिन्हा व राज्य सचिव प्रमोद हजारे यांनी सकाळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची भेट घेतली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीडित मुलीला योग्य त्या वातावरणात ठेवले जावे तिचे समुपदेशन करावे अशी मागणी करण्यात आली. पोलीस तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची दक्षता घ्यावी अशी विनंती सीमा लाटकर यांच्याकडे करण्यात आली.
*पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई होणार*
सध्या पोक्सो कायदा अशा घटनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून पॉक्स अंतर्गत योग्य ती कारवाई केली जाईल. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत असे सीमा लाटकर यांनी सांगितले.
दरम्यान हैदराबाद येथील घटनेच्या नंतर गावागावांमध्ये स्त्री अत्याचाराविरूद्ध आंदोलन छेडले जात आहे. या पार्श्वभूमीवर जलद गती न्यायालयात तातडीने न्याय मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. तथापि नागरिकांच्या संतापाचा उद्रेक वाढत असून याच पार्श्वभूमीवर कडोली ग्रामस्थांनी शुक्रवारी बंद पवित्रा घेऊन बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत्याही पीडित मुलीला हवा महिलेला प्रामुख्याने बलात्काराच्या घटनेत त्वरित निर्भया निधी मंजूर होणे आवश्यक आहे. मात्र या निधीबाबत बरेचसे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले हा निधी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू असे प्रमोद हजारे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.