वाघवडे गावातून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी हा सन्मान मिळवणाऱ्या राघवेणी पाटील या मुलीचा वाघवडे ग्रामस्थांतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.
वाघवडे दूध उत्पादक सहकारी संघ, दुर्गामाता दौड, शिवसेना व ग्रामस्थांच्यावतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात वाघवडे दूध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन बळवंत पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते रागवणी पाटील हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राघवेणी हिच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमास महेश अंबोळकर, संजय कुंडेकर, मारुती गुरव, शिवाजी पाटील, पिराजी शिंदे, यल्लाप्पा मुसळे, मनोहर पाटील, नागेंद्र पाटील, विष्णू पाटील, बंडू गुरव, नामदेव पाटील, नारायण कुपुटकर, रतन पाटील, मंगेश पाटील, विनायक गुरव, यल्लाप्पा धामणेकर आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
वाघवडे गावातून सैन्यात भरती होणारी पहिलीच मुलगी हा सन्मान मिळवणाऱ्या राघवेणी हिचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.