हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू केला तर त्याच ठिकाणी आत्मदहन करू त्या नंतर झालेल्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिला.मंगळवारी सकाळी शिवबसव नगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन बायपास मध्ये जमिनी संपादन करू नये अशी मागणी केली.
हलगा-मच्छे बायपास संबधी 10 तारखेपर्यंत शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कामाला सुरुवात करु नये म्हणून रयत संघटनेतर्फे मच्छे आंदोलनात लेखी निवेदन देण्यास महामार्ग प्राधिकरण खात्याने सांगितले होते त्यानुसार शेतकऱ्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
महिला शेतकरी कृष्णा बाई बिरजे यांची
आमची सर्वच शेती या हलगा मच्छे बायपास मध्ये संपादित केली आहे असे सांगत दुःख अनावर होऊन अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करत होत्या टाहो फोडत होत्या आमची जमीन बळकावू नका-आम्ही पोटाला
काय खाऊ असलेली जमीन तेवढीच आहे असे म्हणत त्या विनवणी करत होत्या.
हलगा मच्छे बायपास रद्द करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा महा मार्ग प्राधिकरण खात्याला देण्यात आला.आम्ही आत्म दहण केल्यास प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्याने विचार करा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली यावर पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवतो पुन्हा तुमच्या सोबत बैठक केल्या शिवाय रस्ता काम सुरू करत नाही असे आश्वासन दिले.
यावेळी शहर रयत संघटना अध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, कार्यदर्शी उमेश बिरजे, तानाजी हलगेकर,रमाकांत बाळेकुंद्री, सोमनाथ सूनगार,राजू मरवे मच्छे अनगोळ शहापूर जुने बेळगाव वडगाव आणि हलगा येथील शेतकरी हजर होते.