मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा लढ्यात प्रत्यक्ष रित्या योगदान दिलेल्या दोन मंत्र्यांना बेळगाव सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री नियुक्त केले आहे.शनिवारी मंत्रालयात बेळगाव प्रश्नी महा विकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीत शिवसेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री पदी नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे.
प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेण्याचे मुख्यमंञ्यांचे आदेश देखील ठाकरे यांनी दिले असून सर्व वकिलांची तात्काळ बैठक घेतली जाणार आहे.
या शिवाय जेष्ठ विधी तज्ञ हरिष साळवेंची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.तत्पूर्वी समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची समन्वयक मंञी म्हणून नियुक्ती एकनाथ शिंदे यांनी 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात बळळारी कारागृहात तर छगन भुजबळ यांनी देखील याच आंदोलनात धारवाड जेल मध्ये तुरुंगवास भोगला होता.गेल्या पाच वर्षात भाजप कार्यकाळात अजिबात समन्वय साधला नव्हता आता ठाकरे सरकारने एक नव्हे तर दोन समन्वयक मंत्री नियुक्त केले आहेत.ते पण बेळगाव लढ्यात प्रत्यक्ष रित्या योगदान असणाऱ्या व्यक्तींना हे पद देण्यात आले आहे.
यावेळी बेळगावातून आमदार राजेश पाटील,समिती नेते दीपक दळवी,किरण ठाकूर,अरविंद नागनूरी,प्रकाश शिरोळकर,सुरेश लांडगे,दिलीप बैलूरकर, माजी आमदार दिगंबर पाटील,प्रकाश मरगाळे,अरविंद पाटील, मनोहर किनेकर,महेश जुवेकर आदी उपस्थित होते.