आर. सी. कुलकर्णी मेमोरियल ट्रस्ट संचलित संभ्रमा संस्थेतर्फे शनिवार दि. 14 डिसेंबर रोजी ‘स्वीट अँड सोर’ या खाद्य पदार्थांच्या पर्यावरण पूरक विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे सलग दोन दिवस या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या ‘स्वीट अँड सोर’ खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी दुपारी 4.30 वाजता कर्नाटक राज्य पुरस्कार विजेते जलसंवर्धक शिवाजी कागणीकर यांच्या हस्ते होणार आहे.
सदर प्रदर्शनांमध्ये बेळगावसह येल्लापूर, हुबळी, हल्याळ, कोल्हापूर आदी भागातील मंडळींचे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे सुमारे 80 हून अधिक स्टॉल्स असणार आहेत.
या खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे वैशिष्ट असे की हे प्रदर्शन पर्यावरणपूरक असणार आहे. याठिकाणी प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला जाणार आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जमा होणारे टाकाऊ पदार्थ अथवा खरकटे आयोजक स्वतः संकलित करून त्याचे खत तयार करणार आहेत.