भारतीय सैनिक हे एक प्रामाणिक आणि निष्ठावंत व कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाते. मात्र आता याला तोतया लष्करी अधिकाऱ्यांच्या वेढ्यातून सोडण्याची वेळ निर्माण झाली आहे. बेळगाव शहरात नुकतीच दोघा तोतया लष्करी अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे बेळगावात किती अधिकारी आहेत, याची माहिती आता पोलिसांनी लावणे गरजेचे आहे.
लष्कर व वायुसेनेचे प्रमुख स्थळ असलेल्या बेळगावात बोगस लष्करी अधिकार्यांचा चांगलाच पेव सुटला आहे. यामुळे नुकतीच एकाला अटक करण्यात आली असून आणि आणखी एका कमांडो असलेल्या भामट्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लष्करात भरती करतो म्हणून अनेक तरुणांना लुटण्यात आले आहे. त्यामुळे सागर पाटील याला पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सैन्यात भरती करतो म्हणून अनेकांना फशी पाडून लुबाडणूक सुरू असते. मात्र बेळगावात सध्या जोरदार लष्करी जवान म्हणून लुबाडणाऱ्याची संख्या वाढली आहे. लष्करात भरती करतो म्हणून एक लाख दोन लाख जेवढी हवे आहे तेवढी रक्कम घेऊन त्यांना नंतर तोंडही न दाखवणारे अधिकारी अधिकच वाढले आहेत. यामध्ये केवळ आता दोघांना अटक करण्यात आली असली तरी आणखी बरेच जण यामध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व टिळकवाडी पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी आर्मी इंटेलिजन्स अधिकाऱ्यांसमवेत येथे केलेल्या कारवाईत सागर पाटील याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन डुप्लिकेट पिस्तुल ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याचे सध्या कसून चौकशी सुरू करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडीत घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या साऱ्या प्रकरणात बेळगाव सध्या लष्करात भरती करतो म्हणून अनेकांची लुबाडणूक झाल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे बेळगावात भामट्या लष्करी अधिकार्यांचा पेव वाढला आहे.
पहिल्या दिवशी कॅप्टन तर दुसर्या दिवशी कमांडोला ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. याचबरोबर आर्मी इंटेलिजन्सच्या माहितीवरून अजूनही बेळगावात काही भामटे लष्करी अधिकारी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आता आणखी किती जणांना ताब्यात घेण्यात येणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र बेळगावात लष्करात भरती करतो म्हणून अनेकांना कशी पाडण्याचे काम अजूनही सुरूच आहे. याबाबत पोलिसांनी दक्षता घेऊन त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी होत आहे.