बेळगावातील आरंभ ढोल- ताशा पथकातर्फे गुरुवार दि. 12 ते शनिवार दि. 15 डिसेंबर या कालावधीत ताल आविष्कार ही भव्य ढोल- ताशा स्पर्धा 2019 आयोजित केली जाणार आहे.
ढोल-ताशा हे समीकरण शिवरायांच्या काळापासून अगदी आजपर्यंत तमाम हिंदू संस्कृतीवर अधिराज्य गाजवत आहे. याच संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी आरंभ ढोल- ताशा पथकातर्फे ही भव्य स्पर्धा घेतली जाणार आहे.
महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यानांमध्ये 12 डिसेंबर पासून रोज सायंकाळी 5 ते ते रात्री 10 वाजेपर्यंत ही स्पर्धा घेतील जाईल. सदर स्पर्धेत बेळगावसह गोवा, निपाणी, चिकोडी आदी भागातील एकाहून एक सरस ढोल- ताशा पथके सहभागी होऊन आपले कौशल्य सादर करणार आहेत

सदर स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली असून संभाजी उद्यानात 60 फुटी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एलईडी स्क्रीन उभारण्यात आली असून संपूर्ण मैदानाला मेटिंग करण्यात आले आहे. याखेरीज लक्षवेधी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.
प्रेक्षकांना स्पर्धेचा आनंद लुटता यावा यासाठी त्यांना बसण्यासाठी अडीचशे फूटाची गॅलरी उभारण्यात आली आहे. एकंदर बेळगाववासीयांसाठी ही स्पर्धा म्हणजे एक मेजवानी ठरणार आहे.