बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हुक्केरी तालुक्यातील दडडी(मोहनगा) येथील
भावेश्वरी देवीची यात्रा 9 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
भावेश्वरी ट्रष्ट कमिटीची बैठक झाली या बैठकीत 2020 यात्रेची तारीख ठरवण्यात आली.रविवारी 9 फेब्रुवारी रोजी शस्त्र इंगळ्या,सोमवार 10 फेब्रुवारी रोजी भर इंगळ्या तर मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी यात्रा समाप्ती होणार आहे.
दरवर्षी फेब्रुवारी पहिल्या ,दुसऱ्या आठवड्यात किंवा जानेवारी समाप्ती सदर यात्रा भरत असते बेळगाव शहर आणि तालुक्यातील लाखो लोक यात्रेत सहभागी होत असतात केवळ बेळगावच नव्हे कोल्हापूर पुणे मुंबई पर्यन्त भाविक वार्षिक यात्रोत्सवाला दड्डीत येत असतात.नवसाला पावणारी देवी म्हणून भावेश्वरी देवी प्रसिद्ध आहे देवीच्या यात्रे दरम्यान लाखों लोक एकत्र असले तरी एकही माशी या भागात नसते हे या यात्रेचे वैशिष्ट्य असते.
मराठी भाषा आपल्या भागात वाढवा
जय हिंद जय विश्वकर्मा ?