शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी एका मार्गावरूनच वाहतूक सुरू आहे.वाहनचालक,शाळेला जाणारे विद्यार्थी,मुलांना शाळेत सोडायला जाणारे पालक यांना मात्र अनेक समस्यांना रस्ते बंद असल्यामुळे तोंड द्यावे लागत आहे.
कॉलेज रोडवर एका बाजूंच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे .त्यामुळे धर्मवीर संभाजी चौकात वळसा घालून गोंधळी गल्लीला जाण्यासाठी यावे लागते.किंवा गोंधळी गल्लीत जायचे असेल तर कित्तूर चन्नमा चौकातून खाली जाऊन सरदार मैदानाकडून गोंधळी गल्लीला जावे लागते.
फिश मार्केट कडून देखील अवजड वाहनांना प्रवेश बंद केल्यामुळे अवजड वाहने सेंट पॉल, सेंट जोसेफ शाळे समोरून शाळा भरायच्या वेळी आणि शाळा सुटायच्या वेळी जात असतात.ही अवजड वाहने शाळेसमोरून जात असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
प्रशासन आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी जनतेची गैरसोय ध्यानात घेऊन रस्त्याच्या कामांचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.अन्यथा रस्त्यावरील खड्डे परवडले पण नवे रस्ते नको म्हणायची वेळ जनतेवर येणार आहे.