मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर सुरू असतानाच आता पुन्हा अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी मळणी व पेरणीच्या कामात गुंतलेला असताना ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळणार का अशी भीती शेतकऱ्यांमधून लागून राहिले आहे.
मागील दोन ते चार दिवसांपूर्वी काही भागात पावसाचा शिडकावा झाला आहे. तर अजूनही ढगाळ वातावरण कायम आहे. सध्या बळीराजा 70 टक्के मळण्याची कामे पूर्ण केली असली तरी अजूनही 30 टक्के मळण्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मळण्या झालेल्या शेतामध्ये पेरणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या वर्षी आलेल्या महापुरामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. हातात तोंडाला आलेले पीक वाया गेले आहे. नदीकाठच्या परिसरात असलेले पीक तर पूर्णता कुजून गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत असतानाच पुन्हा आता पेरणीच्या हंगामात ढगाळ वातावरण असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही प्रमाणात भात पिके मिळाली आहेत. त्यांची मागणी शेतकरी करू लागला आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत येणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.
भात मळणी आणि पेरणी बरोबरच ऊस तोडणी ही जोरदार सुरू आहे. भाजीपाला ही बऱ्यापैकी आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा हवामानात बदल झाल्याने भाजीपाल्यावर याचा परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे. शहराच्या पूर्व भागामध्ये पावसाचा शिडकावा झाला आहे. तर शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पेरणी करावी की नाही या विवंचनेत सध्या शेतकरी आहे.
बेळगाव येथे आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नोव्हेंबरपर्यंत पाऊसच पडला त्यामुळे सुखी पुढे ढकलली होती. आता काही दिवस उघडीप दिल्याने सर्व शेतकरी सुगी कामात गुंतले होते. काही प्रमाणात चुकीची कामे आटोपती घेऊन पेरणीकडे शेतकरी वळत असतानाच पुन्हा मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अस्मानी संकटातून सुटका होते की नाही अशीच भीती शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात येत आहे.