मनपात दाखले मिळवण्यासाठी होतोय विलंब

0
85
Rush city corporation
Rush city corporation
 belgaum

महानगरपालिकेत जन्म आणि मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी तेथील काउंटरवर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.सकाळी लवकर येऊन नागरिकांना हे दाखले मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभारावे लागत आहे.

लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांना मुलांना कडेवर घेऊन दोन तासाहून अधिक काळ रांगेत थांबावे लागत आहे.महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

 belgaum
Rush city corporation
Rush city corporation

आणखी एक काउंटर उघडून दाखले लवकर मिळतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.बेळगाव मनपात प्रशासक लागल्या पासून अनेक जनतेची कामे लवकर होताना दिसत नाहीत त्यातच अनेक कामे देखील रखडली आहेत.जन्म मृत्यू दाखले मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालया प्रमाणे गर्दी होत असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.

मनपाच्या नवीन आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.