Saturday, January 4, 2025

/

प्रेम सौहार्दतेचा संदेश देत सायकल रॅली

 belgaum

सच्चा देशभक्त या नात्याने देशासाठी जीवनात काहीतरी करून दाखवणे हे मी माझे कर्तव्य मानतो, त्यासाठीच प्रेम, शांती आणि सौहार्दतेचा संदेश देण्यासाठी मी 9 राज्यांच्या सायकल प्रवासावर निघालो आहे अशी माहिती पुंगणुर (आंध्रप्रदेश) येथील शेख अब्दुल गफूर यांनी दिली.

Bycycle
Bycycle rally

प्रेम, शांती आणि सौहार्दतेचा संदेश देत चितोड जिल्ह्यातील पुंगणुर येथून आपल्या 100 दिवसांच्या सायकल प्रवासास निघालेले शेख अब्दुल गफूर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश व तेलंगणा या राज्यांना भेटी देणार आहेत.

सध्या 36 दिवसांच्या प्रवासानंतर बेळगावात दाखल झालेले शेख अब्दुल गफूर हे आता मुंबईला रवाना होणार आहेत. दर्शनीय भागावर आय लव माय इंडिया हा फलक असणाऱ्या त्यांच्या सायकलवरील स्वच्छ भारत अभियान मेक इन इंडियाच्या पथकासह प्रेम बंधुत्व शांती व सौहार्दतेचा संदेश देणारे फलक सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.