भाजप सरकारने पाकिस्तान मधील हिंदूंचे पुनर्वसन केले आहे मात्र बेळगावातल्या हिंदू बांधवांचे पुनर्वसन कधी करणार असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.
नागपूर शिवसैनिक मेळावा होता तिथे बोलत होते.
सीमाभागातील मराठी लोक सुद्धा हिंदूच आहेत, कर्नाटकात भाजप सरकार आहे तरी सीमाभागात मराठी लोकांवर भाषिक आणि सांस्कृतिक अत्याचार होतोय. भाजप पाकिस्तानातील हिंदू लोकांचे पुनर्वसन करत आहे पण बेळगाव सीमावासीयांच पुनर्वसन कधी करणार ? असा थेट सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.
महाराष्ट्रातील महा विकास आघाडीचे सरकार सीमा भागातील मराठी जनतेचा प्रश्नाबाबत आक्रमक राहिले आहेत.शपथविधी झालेल्या आठच दिवसात त्यांनी बेळगाव प्रश्नी आपण आग्रही दाखवून दिले होते.
नागपूर अधिवेशनात पहिल्या दिवशीच सावरकर आणि नागरिकता(एन आर सी) मुद्दा गाजत असताना शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बेळगावातील मराठी माणसा बाबत मुद्दा उपस्थित केलाय.