बेळगाव जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघा पैकी गोकाक मतदार संघातील पोट निवडणूक तिरंगी आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे या मतदारसंघात काँग्रेस विरोधात बंड ठोकून भाजपात सहभागी झालेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.काँग्रेस तर्फे रमेश जारकीहोळी यांना त्यांचे लहान भाऊ लखन जारकीहोळी यांनी आवाहन दिलंय तर जनता दलाच्या वतींन अशोक पुजारी उभे आहेत त्यामुळे ही तिरंगी लढत निर्माण झाली आहे.
सध्या गोकाक मध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून तिघेही उमेदवार जिंकण्यासाठी ताकत झोकून देत आहेत त्यातच काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी यांच्या प्रचारात विदेशी पाहुण्यांनी देखील प्रचार करत रंगत भरली आहे.
गोकाकमधील प्रहलाद नावाच्या व्यक्तीचे मित्र असलेले फ्रांस मधील ड्युमिनिक एका आठवड्या पूर्वी मित्राच्या विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गोकाक आले होते. विवाह संपल्यावर त्यांनी पोट निकडणूकी बद्दल माहिती जाणून घेतली फ्रान्स जाण्याआधी त्यांनी लखन जारकीहोळी बाबत माहिती जाणून घेतली गेल्या अनेक जाहीर सभा मधून ते लखन जारकीहोळी यांच्या प्रचार सभेत फिरत आहेत.
ड्युमिनिक हे फ्रांस मधले छोटेशे उद्योजक आहेत राजकारणा बाबत त्यांना आसक्ती आहे लखन जारकीहोळी यांच्या प्रचाराची त्यांना भुरळ घातली असून अनेक सभा मधून ते फिरत आहेत सभा बैठका भाषण प्रचाराची माहिती घेताहेत जनतेच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहेत.गोकाक मधल्या गावागावात हे करत असताना ते लक्षवेधी ठरले आहेत.पूर्ण निवडणूक संपवून माहिती गोळा करून ते विदेशी जाणार आहेत.