सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना बेळगावच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी ‘चन्नम्मा पथक, हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
महिला व युवती वरील वाढते लैंगिक अत्याचार लक्षात घेऊन बेळगाव पोलीस खात्याने महिला पोलिसांचे चन्नमा पथक कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या देखरेखीखाली सध्या पोलीस दलातील महिला पोलिसांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. जेणेकरुन चन्नम्मा पथकातील महिला पोलीस सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा उपयोग करतील. आज केवळ बेळगाव शहरच नव्हे तर देशातच महिला सुरक्षित नाहीत.
महिलांवर अत्याचार झाले किंवा त्यांची सुरक्षितता धोक्यात आली तर सर्वप्रथम पोलिसांना लक्ष्य केले जाते. परंतु समाजातील पुरुषी अत्याचाराला व मानसिकतेला पोलीसही लक्ष ठरत असल्याची उदाहरणे आहेत.
या पार्श्वभूमीवर बेळगावच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी चन्नमा पथक कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने या पथकाला रविवारपासून प्रशिक्षण देण्यास प्रारंभ झाला आहे.