Saturday, November 16, 2024

/

स्विमर्स क्लब बेळगावला अ.भा. स्पर्धेचे सर्वसाधारण जेतेपद

 belgaum

बेळगावच्या स्विमर्स क्लबने फोंडा गोवा येथे आयोजित यंदाच्या अखिल भारतीय कै. श्रीमती सुहासिनी रमेश लोटलीकर स्मृति जलतरण स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले आहे.
लोटलीकर अँड कंपनी गोवा यांच्यातर्फे गेल्या 29 व 30 नोव्हेंबर 2019 रोजी सलग दोन दिवस या अ. भा. पातळीवरील जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगाव स्विमर्स क्लबच्या आर्यन पवार, निरांजनी बोर्डे, सार्थक श्रेयेकर, श्रेया नायक व अनिष कोरे यांनी आपापल्या गटाचे वैयक्तिक अजिंक्यपद हस्तगत केले. क्लबच्या जलतरणपटूंनी विविध गटात संपादन केलेले यश खालीलप्रमाणे आहे.

बॉईज टोडलर्स – सिद्धांत शहापूरकर एक सुवर्ण पदक, एक रौप्यपदक. क्रिश कंग्राळकर एक सुवर्ण, एक कास्य. अनुज अवलक्की एक रौप्य एक कास्य. गर्ल्स टोडलर्स – आरोही चित्रगार एक सुवर्ण, एक रौप्य. पाखी हलगेकर एक रौप्य. मुलांचा गट दुसरा – सनथ अनंत भट दोन सुवर्ण, एक कास्यं. मुलांचा गट तिसरा – आर्यन पवार पाच सुवर्ण, एक रौप्य. वेदांत खननूकर दोन रौप्य, दोन कास्यं. मुरसलीन सनवाले 1 रौप्य. सकश्याम शहापूरकर एक रौप्य पदक. मुलींचा गट तिसरा – निरांजनी बोर्डे चार सुवर्ण,एक रौप्य. प्रणाली जाधव दोन रौप्य, दोन कास्यं. अनन्या पै दोन रौप्य. तनिष्का तारीहाळकर दोन कास्यं.

Swimmers
Swimmers

मुलांचा गट चौथा – अनिश कोरे तीन सुवर्ण, तीन रौप्य. अनिष पै तीन सुवर्ण, दोन रौप्य, तीन कांस्य. अभिमान शेट्टी तीन सुवर्ण, दोन कास्यं. मुलांचा गट पाच – सार्थक श्रेयेकर पाच सुवर्ण पदक, एक रौप्य पदक. अद्वैत दळवी तीन सुवर्ण, ओजस हुलजी दोन सुवर्ण, तीन रौप्य, एक कास्यं. अर्णव निर्मळकर दोन सुवर्ण, एक रौप्य, दोन कास्यं. शिवम नंदगडकर दोन सुवर्ण. मुलींचा गट पाच – श्रेया नायक सहा सुवर्ण. अतिथि शेट्टी दोन सुवर्ण, तीन रौप्य, एक कास्यं. समीक्षा घसारी दोन सुवर्ण, एक रौप्य, एक कास्यं. निधी कुलकर्णी दोन सुवर्ण एक कांस्य. आरोही बोरडे दोन कास्यं पदक.

उपरोक्त सर्व यशस्वी जलतरणपटू स्विमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावचे सदस्य असून ते सुवर्ण जे एन एम सी ऑलंपिक साईझ स्विमिंग पूल आणि रोटरी – कार्पोरेशन स्विमिंग पूल गोवावेस बेळगाव येथे जलतरणाचा सराव करतात. या सर्वांना प्रशिक्षक अजिंक्य मेंडके, अक्षय शेरिगार, नितीश कुडचीकर आणि इमरान उजगांवकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच या सर्वांना डॉक्टर प्रभाकर कोरे, अविनाश पोतदार, श्रीमती माणिक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाने आणि उमेश कलघटगी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.