ग्रहण काळात बेळगाव शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.सकाळी आठ ते अकरा या वेळेत शहरातील रस्त्यावर नेहमीसारखी वाहनांची आणि माणसांची वर्दळ नव्हती.बाजारपेठेत देखील अनेक दुकाने ग्रहण काळात बंद असल्याचे पहावयास मिळाले.ग्रहण काळात हॉटेलमध्ये देखील ग्राहक अत्यंत तुरळक दिसून आले.ग्रहण काळात खाणे,पिणे निषिद्ध मानले जाते म्हणून हॉटेलमध्ये गर्दी रोजच्यासारखी नसल्याचे एका हॉटेल मालकांनी सांगितले.
भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी देखील ग्रहण काळात भाजी विक्री बंद ठेवली होती.ग्रहण काळात शहरातील अनेक मंदिरात अभिषेक,ग्रहण होम,सर्वपिडा होम,जप,ध्यान धारणा आदीचे आयोजन केले होते.ग्रहण लागल्यावर ग्रहणाचे दान द्या म्हणून महिला गल्लोगल्ली फिरत होत्या.
ग्रहण सुटल्यावर देखील दान मागण्यासाठी अनेक जण गल्लोगल्ली फिरत असल्याचे पाहायला मिळाले.
कपिलेश्वर मंदिरात विशेष यज्ञ
ग्रहण काळात दक्षिण काशी म्हणून कपिलेश्वर मंदिरात महा मृत्युंजय यज्ञ करण्यात आला त्या नंतर अकरा वाजता रुद्रा भिषेक झाला मग मंदिर दर्शनासाठी खुले झाले.
ग्रहण काळात ताटात उभे केलेले मुसळ
ग्रहणाबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. दे दान सुटे गिराण ची हाकोटी देण्याचे प्रकारही पाहायला मिळतात. ग्रहण काळात मुसळ ताटात उभे केले की ते कोणत्याही आधाराशिवाय उभेच राहते असे बोलले जाते. असेच ताटात मुसळ येळ्ळूर सह अनेक गावांत परातीत उभं करून ठेवण्यात आलं होतं.घर बसल्या टी व्ही ग्रहण व त्याची माहिती पाहिली.