बीसीसीआय तर्फे आयोजित येत्या 11 ते 14 डिसेंबर दरम्यान हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सी के नायडू चषक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेतील सामन्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या संघाची निवड जाहिर झाली आहे. या संघात बेळगावच्या सुजय सातेरी याची संघाचा उपकर्णधार व यष्टिरक्षक म्हणून वर्णी लागली आहे.
कर्नाटक संघ पुढील प्रमाणे आहे. लुवनीत सिसोदिया (कर्णधार), सुजय सातेरी (उपकर्णधार, यष्टीरक्षक स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लब बेंगलोर), जयेश बाब, अनिकेत उडपी, अभिजित कुलदीप, कृष्णा बेडरे, मनोज भांडगे, वैशक व्ही, प्रणव भाटीया, अब्दुलहसन खालिद, अभिषेक शेट्टी, अभिषेक अलवट, संतोष सिंग आणि शिवकुमार बी.व्ही.
या 15 खेळाडूंच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक – एन. सी. एयप्पा, प्रशिक्षक – दिपक चौगुले, फिजियो – मंजुनाथ, ट्रेनर – इरफान मुल्ला खान, व्यवस्थापक – बी. के. कुमार.
कर्नाटक संघ 11 डिसेंबर पासून हैदराबाद विरुद्ध पहिला सामना खेळेल. त्यानंतर 27 डिसेंबरपासून गुजरात, पाच जानेवारीपासून आंध्र प्रदेश,13 जानेवारीपासून पंजाब, 21 जानेवारीपासून विदर्भ,29 जानेवारीपासून उत्तर प्रदेश, 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र आणि 14 फेब्रुवारीपासून राजस्थान विरुद्ध कर्नाटकाचा संघ सामना खेळेल. कर्नाटक संघातील सुजय सातेरी बेळगावचा सुपुत्र असून उपरोक्त निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.