सोसायटी ऑफ आर्टिस्टिक व्हिजन तर्फे चौथ्या आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवाचे दि.२१ ते २२ डिसेंम्बर दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे संचालक संकेत कुलकर्णी यांनी दिली.पत्रकार परिषदेला सचिन भट आणि श्वेत प्रिया उपस्थित होते.

तरुण चित्रपट निर्मात्यांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लघु चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागचा उद्देश आहे.
लघु चित्रपटांपैकी सत्तर टक्के चित्रपट झिरो बजेट असतात.महोत्सवासाठी जगभरातील 45 देशातून 180 लघु चित्रपट आले होते.
180 लघु चित्रपटातून 58 लघु चित्रपटांची निवड महोत्सवासाठी करण्यात आली आहे.दि.21 रोजी आयनॉक्स चित्रपटगृहात उदघाटन कार्यक्रमाला अभिनेता जितेंद्र जोशी उपस्थित राहणारबसून दि.22 रोजी लोकमान्य रंग मंदिरात होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला प्रख्यात दिग्दर्शक उमेश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
लघु चित्रपट महोत्सवात मराठी,इंग्रजी,हिंदी,जर्मन,स्पॅनिश,श्री लंकन,कन्नड,इटालियन चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.