बेळगाव येथील शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. बेळगाव येथे सुरू असलेल्या बायपास, रिंगरोड आणि हलगा येथे सुरू असलेल्या सांडपाणी प्रकल्प यामुळे शेकडो एकर जमीन आता सरकारच्या ताब्यात जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून काय करावे हे समजत नाही. दि 23 हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
मात्र बेळगाव येथील शेतकऱ्यांनी ज्या जमिनी जाणार आहेत त्याच जमिनीत कृषी दिन साजरा करून निषेध व्यक्त केला आहे.
भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो . मात्र सध्याची परिस्थिती पहाता शेतकरी हा अडचणीत आला आहे . शेतकऱ्यांची सुपीक जमीन हलगा – मच्छे बायपाससाठी हिसकावून घेण्यात आली आहे . याचबरोबर रिंगरोड करण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत .
![Farmers day](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191223-WA0262.jpg)
हलगा येथील सांडपाणी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या तिवारपिकी जमीनी हिसकासवण्यात आल्या आहेत . जर अशा प्रकारे जमीनी हिसकावून घेतल्या तर बळीराजा चिडलेलाआहे असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. हलगा मच्छे बायपास रस्त्यावर शेतकऱ्यांनी पण माडून प्रशासनाचा निषेध नोंदविला . त्यानतर कृषीदिन साजरा करुन पुढील लढाई लढण्याचा निर्धार केला आहे .
यावेळी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, महादेव पवार , राजू मरवे, नरेश तारिहाळकर, विलास घाडी, गजानन लाड , यशवंत रेडेकर , मोहन मरवे, तानाजी हलगेकर मारुती बिर्जे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.