कंग्राळी खुर्द गावचा सुपुत्र आणि बेनन स्मिथ कॉलेजचा विद्यार्थी रोहित चव्हाण याने ब्रॉंझ पदक पटकावले आहे.पंजाब येथील चंदीगड युनिव्हर्सिटीत आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 90 किलो वरील वजनी गटात कांस्य पदक मिळवले आहे.
रोहित चव्हाण यानें राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी कडून सहभाग दर्शवला होता त्याला त्याचे शिक्षक प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.ही स्पर्धा 17 डिसेंम्बर रोजी पंजाब मधील चंदीगड मध्ये झाली होती.देशातील विविध भागातील खेळाडूनी सहभाग घेतला होता.तो बेनन स्मिथ कॉलेजचा विद्यार्थी आहे.
रोहित हा ए पी एम सी बॉक्सइट रोड वरील ओलांपिया जिम मध्ये सराव करत असतो.मागील वर्षी कालीकत केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याला युनिव्हर्सिटी ब्लु हा किताब चन्नम्मा युनिव्हर्सिटी कडून देण्यात आला होता.
रोहित राहणाऱ्या कंग्राळी गावात मसनाई यात्रेनिमित्त बॉडी बिल्डिंग स्पर्धा सुरू असताना त्याच दिवशी त्याचवेळी याचं गावच्या सुपुत्राने पंजाब मधील राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे.