तालुक्यातील पश्चिम भागातील एका नावाजलेल्या ग्रामपंचायत अध्यक्षाला अटक वारंट जारी करण्यात आली आहे. न्यायालयाने ही नोटीस त्याला चार वेळा देण्यात आल्याची माहिती मिळाली असली तरी याबाबत त्या अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे उघडकीस येत आहे.
मागील काही महिन्यापासून या अध्यक्षाने आपल्या मनमानी कारभारामुळे अनेकांना हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या अध्यक्षावर कारवाई करणे गरजेचे बनले आहे. अशा अध्यक्ष नको अशी मागणी सध्याच्या परिसरातील नागरिकांतून होत आहे. मात्र याबाबत कोनच गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येते आहे. अनेकांना लुबादण्यात आल्याचेही निदर्शनात आले असून याबाबत वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एका खाजगी संस्थेतील रक्कम उचलून ती परत न भरल्याने ही अटक वॉरंट न्यायालयाने बजावण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एका लोकप्रतिनिधीने असले गैर धंदे केले तर इतरांचे काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे अशा अध्यक्षवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या अध्यक्षांनी आपल्या मनमानी कारभारामुळे अनेकांना नाहक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. काही बिलेही न दिल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. मागील तीन ते चार वर्षापासून अनेकांना दिले देतो म्हणून सांगण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. सोसायटीचे बिल न दिल्यामुळे त्यांना अटक वारंट न्यायालयाने बजावले आहे. त्यामुळे पोलिस त्यासंबंधीत अध्यक्षच्या शोधात असल्याचे दिसून येत असून लवकरच त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.