मराठी,कन्नड दोघांनी कलेसाठी एकत्र यायला हवे असे विधान जितेंद्र जोशी यांनी केल्यामुळे अनेक मराठी तरुणांनी त्यांना ट्रोल केले.नंतर जितेंद्र जोशी यांनी आपली यासंबधी आपली भूमिका स्पष्ट केली.
सगळे जण बेळगावातील मराठी जनतेला सल्ला देतात.विश्व कन्नड संमेलनाच्यावेळी अनेक मराठी भाषिकांची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली त्यावेळी कन्नड लोकांना कोणी सल्ला दिला होता काय?बेळगावात मराठी नाटके येणे बंद झाले आहे.मराठी अभिनेत्यांनी मानधन कमी घेऊन बेळगावात नाटक आणण्यासाठी प्रयत्न केलेत काय? येळ्ळूर मारहाणीवर लघु चित्रपट कधी बनवला गेला काय यासाठी जोशी पुढाकार घेतील काय? असे अनेक प्रश्न करण्यात आले.
खालील प्रमाणे ट्विट करत त्यांनी भूमिका मांडली आहे.
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या मराठी तरुणांना अधिक पाठिंबा मिळावा म्हणून मी मराठी,कन्नड लोकांनी कलेसाठी एकत्र यावे म्हणालो होतो.मराठी तरुणांच्या अमंत्रणावरूनच मी बेळगावला आलो आहे.माझ्या विधानाचा विपर्यास केला गेलाय हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता जितेंद्र जोशी यांनी ट्विटर वर व्यक्त केली आहे.