Saturday, December 21, 2024

/

अंगावर भारा पडून युवा शेतकऱ्याचा अंत

 belgaum

भात कापणी करायला गेलेल्या युवा शेतकऱ्याचा बांधा वरून उतरताना अंगावर भाताचा भारा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जुने बेळगाव येथे घडली आहे.अजय सुरेश पाटील वय 23रा.कुलकर्णी गल्ली जुने बेळगाव असे भारा पडून अंत झालेल्या युवकाचे नाव आहे.रविवारी दुपारी एक च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

सध्या बेळगाव परिसरात भातकापणी,बांधणी हंगाम सुरु आहे रविवारी सकाळी कुलकर्णी गल्ली जूनेबेळगाव येथील युवा शेतकरी कुमार अजय सुरेश पाटील वय 23 हा आपले काका तानाजी पाटील यांच्या शेतात भात बांधणी करण्यासाठी सर्वांबरोबर गेला होता.शेतात भाताचे भारे आणतानां बांधावरुन जात असता त्याचा अंत झाला आहे.

Ajay p
Ajay p

घटना घडताच प्रसंगावधान राखून लागलीच त्याला उपचारासाठी के एल ई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा उपयोग झाला नाही.या घटनेने जुने बेळगाव गावावरशोक कळा पसरली असून तरुण युवक मयत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत अजय हा धडधाकट असा होता तो बॉडी बिल्डिंग देखील करत होता. सोमवारी सकाळी त्याचे वर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.