बेळगाव तालुक्यातील नंदीहळळी येथील प्रसिद्ध देवस्थान वाकडेवड येथे जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नातुन यात्रेकरूंच्या सोयीसाठी शेडची निर्मितीचे काम सुरु करण्यात आले आहे.
या भागात वाकडेवड हे देवस्थान खूप प्रसिद्ध असून शेत वाडीत असल्याने दर्शनासाठी आलेल्या भविकांना बसायची सोय देखील नव्हती केवळ बेळगावच नव्हे तर महाराष्ट्र आणि गोव्यातून देखील भाविक दर्शनासाठी येत असतात. सोमवार शनिवार वगळता आठवड्यातील इतर दिवस इथे अनेक कार्यक्रम होत असतात भाविक येजा करत असतात अश्याना सोय व्हावी म्हणून शेडची निर्मिती करण्यात येत आहे.
रमेश गोरल यांनी जिल्हा पंचायतीतुन पाच लाख रुपये मंजुर केले असून यातून शेड उभारले जात आहे.सध्या एक शेड उभे केले जात आणखी दोन मोठे शेड उभारणार असल्याची माहिती गोरल यांनी दिली.
यावेळी शेडचे भूमिपूजन करण्यात आले.मनोहर टोपकार,कृष्णा पाटील,संजय मादार परशराम कोलकार महादेव जाधव सुधीर राघूचे,महादेव लोकूर सिद्राय देसुरकर सुरेश जाधव मारुती लोकूर आदी नंदीहळळी ग्रामस्थ उपस्थित होते