जेव्हा जनतेचे रक्षण करणारे पोलीसच भक्षक बनले तर काय करावे? हा सवाल सध्या बेळगाव येथे लागू होतो. बेळगाव येथील पोलिस दलात वरकमाई साठी वाटेल ते अशीच किमया सुरू आहे. त्यामुळे बेळगाव येण्यासाठी अनेक पोलीस धडपडत असतात. याआधीही वर कामांसाठी गुन्हे केलेल्या पोलिसावर फिर्याद दाखल झाली आहे. टिळकवाडी पोलिसांनी मटका मुकीच्या घरी दरोडा टाकल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ माजली असून पोलिसांच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
मटका प्रकरणी मंडळी रोडवरील दामोदर महादेव मुदलियार, मारुती भिमाप्पा नायक राहणार अनगोळ, विनायक गोपाळ कांगले राहणार पाटील मळा या या तिघांवर टिळकवाडी पोलिसांनी अटक करून अकरा हजार 600 रुपये जप्त केले होते. प्रत्यक्षात 42000 हून अधिक रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात आले आहेत. मात्र कागदोपत्री अकरा हजार रुपये दाखविण्यात आल्याने उर्वरित रक्कम पोलिसांच्या खिशात गेली काय? आरोप करण्यात येत आहे.
दामोदर यांची आई व त्यांची पत्नी धुणी भांडी करतात. हीच रक्कम त्यांनी साठवून ठेवली होती. मात्र पोलिसांनी कपाट फोडून त्यांच्या घरातील चाळीस हजार रुपये लांबवण्याचा आरोप पोलिस आयुक्तांकडे करण्यात आला आहे. पोलिसांना पैसे खाण्याचा भस्मासूर अत लागला आहे काय? असा सवाल उपस्थित करत गरीब कुटुंबांचे पैसे परत करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तिजोरी फोडून चोरट्याप्रमाणे घरातील पैसे त्यांनी लांबविले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मुलीशी असभ्य वर्तणूक त्यांनी केली आहे. त्यामुळे पोलीस आहेत की भक्षक? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पैशांसाठी वाटेल ते असाच फंडा पोलीस राबवत आहेत. बेळगाव जिल्ह्यासह अनेक ठिकाणी हे प्रकार घडत असून याकडे मात्र पोलिस आयुक्तांनी पाठ फिरवली आहे. जर गरीब कुटुंबांना नाहक त्रास देण्यात येत असेल तर इतरांचे काय? नागरिकांच्या रक्षणासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात येते. मात्र पोलीस दरोडे घालण्यास सुरूवात केल्यावर चोरट्यांनी काय करावे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यापुढे तरी पोलिस प्रशासनावर लागलेली धब्बे कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशीच मागणी सर्वसामान्य आतून होत आहे.