तालुका पंचायत मध्ये दोन आमदार कक्ष आहेत मात्र ही आमदार कक्ष बंद अवस्थेत असल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या कक्षांचा वापर करण्यात न आल्याने ही तसेच पडून आहेत. त्यामुळे ही कक्ष असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहेत. मात्र या कक्षांमध्ये अधिकाऱ्यांनी कार्यालयीन साहित्य ठेवल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यमकनमर्डी आमदार आणि दक्षिण आमदार या दोघांसाठी तालुका पंचायतीमध्ये कक्ष आहेत. मात्र या कक्षामध्ये एकदाही पाऊल टाकण्यात न आल्याने ही कक्ष तसेच धूळखात पडून आहेत. ही कक्षे याआदी वापरण्यात येत होती. मात्र आता ती पडूनच आहेत. यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या कार्यकर्त्यांनी ते कक्ष स्वच्छ केले होते. मात्र आता पुन्हा ते बंद अवस्थेत असल्याने तसेच पडून आहे. तर दक्षिणचे आमदारांचे धूळखात आहे. त्यामुळे यांचा वापर नागरिकांसाठी व्हावा अशी मागणी होत आहे.
या दोन कक्षा मधील एका कक्षात येथील अधिकाऱ्यांनी संगणक टेबल-खुर्च्या यासह इतर निकामी असलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेमक्या या कक्षांचे कशासाठी वापर करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदारांच्या कक्षात केर कचरा टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी त्या कक्षाची डागडुजी करण्याची त्याच्यात नको त्या वस्तू ठेवण्यात धन्यता मानली आहे. याकडे आमदारांचा कार्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
यापूर्वी हे एकच वापरण्यात येत होते. मात्र आता तर तब्बल दीड दोन वर्षे झाली हे कक्ष धूळखात पडून आहेत. या मधील इतर साहित्य लांबविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे कक्ष पुन्हा नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावेत तसेच या कक्षांची डागडुजी करून सुस्थितीत ठेवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहेत.