पावसाच्या सततच्या माऱ्याने तालुक्याच्या पूर्व भागातील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
हलगा, मास्तमर्डी, शिंदोळी तारीहाळ, सांबरा, बसरीकट्टी, मोदगा, मारिहाळ, चंदनहोसुर आदी पर्व भागातील माळ जमिनीत सोयाबीन पिकवण्यात येते. महिन्याभरापासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अनेक ठिकाणी पावसात सापडलेल्या पिकांच्या दाण्यांना कोंब फुटले आहेत. अचानक सुरू होणाऱ्या पावसामुळे काढणी, मळणी करावी की नाही अश्या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघणे मुश्कील बनले आहे. शासनाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.