स्मार्ट सिटी योजनेतील रस्त्याने बळी घेतल्यावर आता स्मार्ट सिटीवाले झोपेतुन खडबडून जागे झाले आहेत.मंडोळी रोडवर स्मार्ट सिटी योजनेतील रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.त्यामुळे जनतेने स्मार्ट सिटी कार्यालया समोर धरणे धरले होते.
या घटनेच्या दोन दिवसांनी अधिकारी जागे झाले आहेत इतक्या उशिरा जागे झालेल्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी आता मंडोळी रोडवर प्रखर झोताचे दिवे बसवले आहेत.खड्डा असलेल्या ठिकाणी सूचना देणारी टेप बांधली आहे.
मंडोळी रोड वरील खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा बळी गेला होता त्यामुळे मयताच्या नातलगांनी स्मार्ट सिटी ऑफिस समोर निदर्शन केली होती त्या नंतर ठेकेदारावर आय पी सी 409 अ अंतर्गत सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ ठेकेदारावर कारवाई करून सुस्त अधिकाऱ्यांना अभय देण्यात आल्याचा आरोप जनतेतून होत होता त्यामुळे अधिकारी जागे झाले असून जीव घेतलेल्या खड्ड्या शेजारी टेप बांधली आहे व रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या साठी म्हणून विद्युत दीप बसवले आहेत.
केवळ मंडोळी रोड वर उपाय करून काय करणार?शहरातही इतर रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांचे काय?बंद असलेल्या पथ दिपांचे काय याचे उत्तर देखील मनपा किंवा स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडे आहे का? असा संतप्त सवाल बेळगावकर विचारत आहेत.