शहरात सुरू असलेली विकासकामे जनतेसाठी जीवघेणी ठरत आहेत.अनेक रस्त्यांचे तीनतेरा वाजले असून दररोज खड्डे चुकवताना अपघात होऊन लोक जखमी होत आहेत.खड्डे इतके भयंकर आहेत की चालत जाणे देखील अवघड बनले आहे.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.मंडोळी रोडवर देखील कालच एकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.यासाठी आता जनतेनेच पुढे येऊन शहरातील रस्त्यांची दुरावस्था प्रशासना पर्यंत पोचवणे गरजेचे आहे.
बेळगाव Liveने यासाठी सेल्फी विथ खड्डा मोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे.नागरिकांनी आपल्या भागातील खराब रस्ता आणि खड्डे यांची सेल्फी घेऊन पाठवायचे आहे.सोबत आपले नाव,भागाचे,रस्त्याचे नाव तपशील सोबत पाठवणे आवश्यक आहे.
बेळगाव Live च्या सेल्फी विथ खड्डा मोहिमेत सहभाग घ्या..खड्डा प्रशासना पर्यंत पोचवा-खड्डा बेळगाव शहर तालुक्यात कोणत्या ठिकाणी असलेले खड्डे ,त्याचा साईज किती आहे याची माहिती सेल्फी फोटो 9448351816 वर व्हाट्सअप्प करू शकता…सिंगल किंवा ग्रुप सेल्फी पाठवला तरी चालेल..
सदर खड्ड्याच्या फोटो ला आम्ही तुमच्यां नावासह प्रसिद्ध करू! सदर मोहिम एक आठवडाभर चालणार आहे.तर चला खड्ड्या सोबत सेल्फी पाठवू आणि प्रशासनाला सजग करू.