माझा जन्म जरी कोल्हापुरात झाला असला तरी माझं शिक्षण वास्तव्य बेळगावातले आहे त्यामुळे माझ्या वडिलांच्या कारकिर्दी पासून गेली 63 वर्षे लढा सीमा बांधव देत आहेत.विधी मंडळात या प्रश्ना बद्दल आवाज उठवू असे आश्वासन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी दिले.
शुक्रवारी दुपारी मराठा मंदिर सभागृहात काळ्या दिनाच्या सायकलफेरी नंतर सभेत बोलत होते.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती अध्यक्ष दिपक दळवी होते. यावेळी माजी आमदार मनोहर कीनेकर, मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे उपस्थित होते.
चंदगडचा आमदार म्हणून विधी मंडळात बेळगाव प्रश्नी आवाज उठवू व सुप्रीम कोर्ट सोडवणुकीसाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
शिवसेना सीमा बांधवांच्या पाठीशी ठाम:एकनाथ शिंदे
शिवसेनेने सीमा भागासाठी ६९ शिवसैनिकांचे बलिदान दिले बेळगाव , कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीवर शिवसेना आजही ठाम आहे असे आश्वासन शिवसेनेचे विधी मंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.त्यांनी काळ्या दिनाच्या सभेत त्यांनी संवाद साधला होता.
शिवसेना काल, आज आणि उद्याही सीमा बांधवासाठी जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करणार -बेळगाव प्रश्न माझ्या जिव्हाळ्याचा , 1986 साली बेळगावात राणी चांन्नमा चौकात हिंसक आंदोलन केल्यामुळे ठाणे शहर शिवसेना मधील 100 शिवसैनिकांना अटक केली होती-*बेळगाव मधील 1986 साली हिंसक आंदोलन प्रकरणी माझ्यावर गुन्हा , मी स्वतः 1 महिना बेल्लारी जेल मध्ये होतो* असेही ते म्हणाले.