कित्तूर औद्योगिक वसाहतीत रेल्वेसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याच्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी मंत्री झाल्यापासून बेळगावच्या जनतेसाठी नवीन रेल्वे सुरू केलेत,रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे,नववर्षात बेळगाव ते पुणे जनशताब्दी रेल्वे सुरू करण्याची देखील घोषणा झाली आहे.
उत्तर कर्नाटकचा विकास आणि उद्योगांची उभारणी करण्याचे ध्येय मंत्री अंगडी यांनी बाळगले आहे.त्यामुळे बेळगाव आणि परिसरातील जनतेला रोजगार,व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याचा अंगडी प्रयत्न करत आहेत.
गेली पंधरा वर्षे खासदार म्हणून निवडून येऊन बेळगावात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले नाहीत,कोणताही मोठा उद्योगसमूह आणला नव्हता मात्र रेल्वे राज्य मंत्री पद मिळताच त्यांनी रेल्वे साठीसुटे भाग तयार कारण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे.कित्तुर हे बेळगाव आणि धारवाडच्या मधोमध आहे दोन्ही कडील लोकांना यातून रोजगार मिळावा यासाठी कित्तुर निवडले असावे अशी शक्यता आहे.