श्री रामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक व राज्याध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीन करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांद्वारे केंद्रीय गृह मंत्र्यांना निवेदन देत सदर मागणी करण्यात आली आहे.
अलीकडे देशात अनेक हिंदू नेत्यांवर हल्ले झालेले आहेत अनेकांच्या हत्त्या झाल्या आहेत.देश विघातक शक्तींनी या क्रूर हत्त्या घडवून आणल्या आहेत.कर्नाटकात देखील श्री रामसेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या जीवाला धोका आहे.
नुकताच अटक केलेल्या टोळीने मुतालिक यांच्या हत्येची सुपारी घेतल्याचे चौकशीत निदर्शनास आले होतेया शिवाय श्रीराम सेनेचे राज्याध्यक्ष सिद्धलिंग स्वामीजी यांच्या वर देखील हल्ल्याची शक्यता आहे यासाठी तात्काळ यांची सुरक्षा वाढवावी त्यांच्या सुरक्षेकरिता अंग रक्षक नियुक्त करावा अशी मागणी केली जात आहे.