आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार विकास विनायक पाटणेकर यांच्या जलरंगातील चित्रांचे प्रदर्शन दि.९ ते १३ नोव्हेम्बर या कालावधीत महावीर आर्ट गॅलरी,हिंदवाडी येथे भरणार आहे.पत्रकार परिषदेत विकास पाटणेकर यांनी ही माहिती दिली.उत्तर विभागाचे आय जी पी राघवेंद्र सुहास यांच्या हस्ते दि.९ रोजी सकाळी १०.३० वाजता उदघाटन होणार आहे.
विसहून अधिक जलरंगातील चित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.अलीकडेच पाटणेकर यांना उरुग्वे येथील रेड आर्ट गॅलरीचा आर्टिस्ट ऑफ द इयर हा मानाचा मिळाला आहे.परदेशात सोळाहून अधिक आणि देशातील विविध शहरात विसहून अधिक प्रदर्शने त्यांनी भरवली आहेत.
विकास पाटणेकर हे मूळचे बेळगावचे असून सध्या त्यांचे वास्तव्य मुंबईत आहे.बेळगावचे चित्रमहर्षी के.बी.कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे.जगातील दहा नामवंत जलरंग चित्रकारात विकास पाटणेकर यांचा समावेश होतो.