विहिरीत पोहताना दुसऱ्याने अंगावर उडी घातल्याने पोहणारा जखमी होऊन बुडल्याने एकट्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान जुने बेळगाव येथील तलावा शेजारील मनपाच्या विसर्जन कुंडात घडली आहे.
प्रकाश मारुती नाईक वय 52 रा.बाबले गल्ली अनगोळ असे या घटनेत मयत झालेल्याचे नाव आहे. मयत प्रकाश हे जुने बेळगाव येथील विसर्जन तलाव कुंडात आपल्या मित्रांसह पोहायला गेले होते त्यावेळी एका युवकाने ते पोहत असताना त्यांच्या अंगावर उडी घेतली त्यात त्यांच्या मानेला उडी मारणाऱ्या युवकाचा गुडघा बसल्याने ते बेशुद्ध होऊन बुडले त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
मयत प्रकाश हे आपल्या मित्रांसह दररोज स्विमिंगला जातात गेली कित्येक वर्षे ते कपिलेश्वर तलावात स्विमिंग करत होते त्याची दुरुस्ती सुरू असल्याने त्यांचा ग्रुप जुने बेळगाव विहिरीत पोहायला जात होता.विहिरीत पोहणाऱ्याच्या अंगावर उडी मारणाऱ्या युवकाच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून तो फरारी आहे.
सकाळी सातच्या दरम्यान ही घटना घडली त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.मयत प्रकाश यांच्या पश्चयात पत्नी दोन मुले असून निष्काळजीपणे पोहणाऱ्याच्या अंगावर उडी मारल्याने जीव गमवावा लागला आहे.शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आलाय.