बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी संपूर्ण दिवसभर शहरातील विविध भागात जनस्पंदन(जनसंपर्क) कार्यक्रम आयोजित करून जनतेच्या समस्या सोडविल्या.
शहरातल्या एपीएमसी रोड बसवण्णा मंदिर, ज्योतिनगर,बसव कॉलनी,संगमेश्वर नगर,अजय नगर आणि अन्य भागातील जनतेच्यासाठी जनस्पंदन कार्यक्रम आयोजित करून जागेवरच त्यांच्या समयांचे निराकरण केले.
यावेळी बेनके यांनी स्वतः फिरून मूलभूत सुविधांची पाहणी केली.बेनके यांच्या समवेत विविध खात्याचे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.आपला निधी आणि अन्य सरकारी योजनेतून जनतेची कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना बेनके यांनी केल्या.
दिवसभर बेनके यांनी जनस्पंदन कार्यक्रम आयोजित करून जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.कामें होतील पण जनतेच्या संपर्कात रहाणे महत्वाचे आहे त्यामुळेचं आमदारांनी संपर्क अभियान हाती घेत उत्तर भागात कामे सुरू केली आहेत.