एच.डी. देवेगौडा हे केवळ चार खासदार त्यांच्या पक्षाचे असताना पंतप्रधान झाले होते.सध्या केंद्रात
रेल्वे राज्यमंत्रीपद भूषवत असलेले सुरेश अंगडी हे भविष्यात पंतप्रधान होतील असे उदगार के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांनी काढले.
अखिल भारत वीरशैव महासभेच्या जिल्हा केंद्र आणि अखिल भारत वीरशैव महासभा बंगलोर केंद्र यांच्या वतीने जिरगे सभागृहात लोकप्रतिनिधींच्या सत्काराचे आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कोरे यांनी भविष्यात सुरेश अंगडी हे पंतप्रधान होतील असे भाकीत केले.बेळगावचे चौथ्यांदा खासदार झालेल्या अंगडी यांना केंद्रात रेल्वे राज्य मंत्री पद मिळालेलं आहे ते पंतप्रधान होतील असं कोरे म्हणाले.
या अगोदर बेळगावातील राजकारणी सरकार पालटू शकतात असं देखील वक्तव्य त्यांनी काँग्रेस जनता दल मैत्री सरकारच्या काळात काढले होते.उमेश कत्ती यांच्यात मुख्यमंत्री पदाची क्षमता आहे असं देखील त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं आता त्यांनी अंगडी यांच्या बाबत देखील ते पी एम होतील असे म्हटलंय.