समाजातील भ्रष्टाचाराच्या किडीवर युवकानी पुढाकार घेऊन लढण्याची गरज आहे.भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्याची मानसिकता तरुण वर्गात निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे उदगार पर्यावरणवादी शिवाजी कागणीकर यांनी काढले.
बेळगाव येथील भ्रष्टाचार निर्मूलन व सामाजिक संस्थेची वार्षिक बैठक मराठी विद्यानिकेतन हायस्कूल येथे संपन्न झाली .यावेेळी शिवाजी कागणीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेेळी शिवाजी कागणीकर याना राजयोत्सव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात नामदेव मोरेनी सर्वानी निस्वार्थी भावनेने काम करण्यास सांगितले तसेच गेल्यावर्षभरात संस्थेतर्फे सोडवलेल्या भ्रष्टाचारच्या तक्रारी मोर्चे यांची माहिती दिली यावेली वाय पी नाईक विश्र्वशरय्या हिरेमठ यशवंत भांदुर्गे भारत जाधव प्रकाश लाखे अशोक कांबळे अनिल पाटील यांनी मनोगत मांडले.
यावेळी अडव्याप्पा कुंबरगी, पवन देसाई, जयवंत सालुंखे, नागोजी मुतगेकर, केंपन्ना तलवार, यल्लाप्पा गस्ती, शांतव्वा कुरबर, अनिता पाटील, पद्मा बसरीकट्टी, संजना पाटील, सतीश जाधव, निलेश मोरे, धाकलू ओऊलकर हजर होते, मयूर नागेनहट्टी यांनी सुत्रसंचालन केले व नागेश देसाईनी आभार मांडले यावेली बिजगर्णी, कावळेवाडी, बेळगुंदी, किणये,कर्ले, हिंडलगा,सुलगा, कंग्राली, कट्टणभावी, कडोली, मच्छे,पिरनवाडी, उचगांव, वंटमुरी, सांबरा गावातील तसेच बेलगाव तालुक्यातील व हुक्केरी तालुक्यातील लोक व महिलांची विशेष उपस्थिति होती.