जम्मू काश्मीर मधील पुंछ सेक्टर मध्ये पाकिस्तानी सैन्याशी समोर समोर झालेल्या गोळीबारात हुतात्म्य पत्करलेला बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील जवान राहुल सुळगेकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंतिम संस्कार केला जाणार आहे.
जम्मू हुन त्याचे पार्थिव शनिवारी दुपारी 12 वाजता मुंबई मार्गे सांबरा विमानतळावर आणले जाणार आहे त्या नंतर मराठा सेंटर मध्ये देखील श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्या नंतर उचगावं येथील त्याच्या गावात शासकीय इतमामात अंतिम संस्कार केला जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी राहुल शहीद झाल्याची बातमी येताच उचगाव गावावर शोक कळा पसरली आहे.गावाच्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत स्वच्छता करण्यात आली आहे.तहसीलदार मंजुळा नाईक यांनी उचगावला भेट देऊन सुळगेकर परिवारचे सांत्वन केलं व अंतिम संस्कार तयारीची पहाणी केली.गावात अनेक ठिकाणी वीर जवान अमर रहे असे फलक लावून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
उद्या उचगावात जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी अन्य अधिकारी व लोकप्रतिनिधी श्रद्धांजली वाहणार आहेत.
गुरुवारी रात्री झाली होती चकमक
गुरुवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान पुंछ सेकटर मध्ये पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यात झालेल्या गोळीबारात त्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता उपचारासाठी त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते मात्र मध्यरात्री तो शहीद झाला होता.