Tuesday, January 7, 2025

/

सीमावासीयांच्या अपेक्षा वाढल्या

 belgaum

वेगवेगळे प्रयत्न करून राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार यांना फोडून सकाळच्या वेळी शपथविधी घेऊन भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला असला तरी तो अपयशी ठरला आहे. शिवसेनेला फाटा देऊन सरकार स्थापनेच्या प्रयत्नाने भाजपची परिस्थिती कठीण झाली आहे .या परिस्थितीत आता महाशिव आघाडीचे सरकार येणार आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ही बातमी बाहेर पडल्याने सीमावासियांच्या अपेक्षा आणि आकांक्षा नक्कीच वाढल्या आहेत.

सीमाप्रश्नाचा लढा अर्थात संयुक्त महाराष्ट्राचा लढा बेळगावातून सुरू झाला .या लढ्यात सार्‍या देशाचे लक्ष वेधून घेण्याचे काम शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते .या प्रश्नासाठी मुंबई बंद करून सीमाप्रश्नाच्या आंदोलनात रान पेटविण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यावेळी त्यांना स्वतःला अटक झाली त्याचबरोबरीने शिवसेनेच्या हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने शिवसेना सीमावासीयांच्या पाठीशी आहे. सीमाप्रश्नाचा लढा सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना त्यांची बाजू घेणारे सरकार महाराष्ट्रात स्थापन व्हावे अशी अपेक्षा सीमावासियांना होती. भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार झाले तर शिवसेना सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या भाजपला सीमावासीयांची भावना सांगुन हा प्रश्न नक्कीच सोडून घेईल ही अपेक्षा होती ,मात्र भाजपने शिवसेनेला सोडून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे ,आता अपयशी ठरलेल्या भाजपला आपली जागा दिसून आल्यामुळे बेळगावचे नामकरण बेळगावी असे करणारा भाजप सीमावासियांचा शत्रू आहे ,अशी भावना निर्माण झाली असून शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार त्यामुळे संपूर्ण सीमाभागात आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे ,

मुख्यमंत्री शिवसेनेचा त्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पाठिंबा आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुप्रीम कोर्टातील केस मध्ये विशेष लक्ष आहे त्यातच ठाकरे परिवतातील सदस्य मुख्यमंत्री म्हणजे सिमा वासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्यात योग्य ती भूमिका घेऊन शिवसेनेचे मुख्यमंत्री ठरणाऱ्या उद्धवजी ठाकरे यांनी सीमा प्रश्न तडीला लावावा अशी अपेक्षा आहे .

ठाकरे यांनी वेळोवेळी नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला आहे. या लढ्यात आपले बळ दिले आहे.. स्वतः आश्वासने देऊन पाठ फिरवणाऱ्या पैकी उद्धवजी ठाकरे नाहीत . ते स्वतः सहभागी झालेले असल्यामुळे लढ्याला आता बळकटी येईल अशी आशा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.