रमेश याला मंत्री केल्याबद्दल मी लक्ष्मी हेब्बाळकर यांना विरोध केला होता.खुळ्याला मंत्री केला म्हणून मी लक्ष्मी यांच्याशी भांडलो होतो इतकेच.माझ्यात लक्ष्मी हेब्बाळकर आणि डी. के.शिवकुमार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत.आम्ही एक आहोत.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाया पडून रमेश मंत्री झाला होता.आता गोकाक मतदारसंघाच्या प्रभारी लक्ष्मी हेब्बाळकर आहेत.प्रचारासाठी त्या येतील तेव्हा सगळे सांगतील असा बॉम्ब आमदार सतीश जारकीहोळी यांनी गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना टाकला.
गोकाक विधानसभा मतदार संघात सतीश जारकीहोळी आणि रमेश जारकीहोळी यांच्यात वागयुद्ध रंगताना पाहायला मिळत आहे.
सतीश जारकीहोळी हे हेब्बाळकर यांच्या घरी चहा प्यायला जातात अशी टीका रमेश जारकीहोळी यांनी केली होती.होय मी हेब्बाळकर यांच्या घरी चहा प्यायला जात होतो.सध्या जात नाही पण पुढे पुन्हा जाईन असे प्रत्युत्तर सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.