कर्नाटकातील जनता दल काँग्रेस सरकारच्या पतनास बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि डी के शिव कुमार जबाबदार आहेत असा गौफ्यस्फोट रमेश जारकीहोळी यांनी केलाय.
बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात डी के शिवकुमार यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केला होती लक्ष्मी हेब्बाळकर यांना आमच्या डोक्यावर बसवायला सुरुवात केली होती म्हणून मी गप्प बसलो नाही असा टोला देखील त्यांनी लगावला. गोकाक विधानसभा मतदारसंघात भाजप कडून रमेश जारकीहोळी हे पोट निवडणूक लढवत आहेत शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
डी के शिवकुमार यांच्याशी सुरुवातीला माझ्याशी सख्य होते त्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात हस्तक्षेप करायला सुरू केल्याने वाद विकोपाला गेला.लक्ष्मी हेब्बाळकर जर सिनियर राहिल्या असत्या तर त्यांना मुख्यमंत्री केलं तरी आम्हाला काहीही फरक पडत नव्हता मात्र तिला आमच्या डोक्यावर बसवण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेतलो नाही.
हेब्बाळकर ना सिद्धरामय्या डी के शी दिनेश गुंडुराव यांनी काँग्रेस जे डी एस सरकारच्या कार्यकाळात कोणते मोठे पद देणार नाही असं सर्वांच्या समोर मला आश्वासन दिले होते मात्र निगम मंडळ अध्यक्ष बनवलं गेले होत पुढे जाऊन मंत्री पद देणार नव्हते कश्या वरून? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला .
हेब्बाळकर मंत्री झाली असती तरी आम्हाला काहीही फरक पडला नसता किंवा तिला मंत्री केले म्हणून माझ्या पोटात गोळा येण्याचे काहीही कारण नाही तिच्या नशिबी असेल तर मंत्री होऊ देत मात्र तिच्यासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला सारण हे कितपत योग्य होत? राबलेल्यांची चिंता करायला हवी की नको?अस देखील त्यांनी नमूंद केलं.
अनेकांनी मला हेब्बाळकर यांना तिकीट देऊ नका त्या बरोबर नाहीत असे निकडणुकी अगोदर सांगितलं होतं तरी देखील उमेदवारी मिळवुन देऊन निवडून आणण्यासाठी मदत केली हीच आमची मोठी चूक होती.डी के शी यांच्या हातात काँग्रेस आहे मी करेल ती पूर्व दिशा होईल असा अहंकार लक्ष्मी यांना जडला होता असा देखील टोला त्यांनी लगावला.