कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील वारकऱ्यांच्या टेम्पोला आज पहाटे 3-45 वाजता सांगोला जवळील जुनुन गावाजवळ अपघात झाला या टेम्पोमध्ये पंचवीस प्रवासी पंढरपूरला जात होते.
यामध्ये पुंडलीक गावडु पाटील वय 50 वर्षे,कृष्णाजी यलारी पाटील वय 45 वर्षे,मुकुंद महादेव पाटील वय 52 ,नारायण विठोबा पाटील 70,विष्णु भगवंत पाटील 50,रूद्राप्पा रवळु पाटील,50 हे भुतेवाडी गावचे वारकरी गंभीर जखमी झाले असुन त्यांना मिरज येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे, सर्व वारकऱ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असुन काळजी करण्यासारखे काही नसल्याचे समजते, यामध्ये किरकोळ जखमी झालेल्या सहा महिला व चार पुरूषांना सांगोला येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघात झालेल्या ठिकाणाहून भुतेवाडी चे जावई आसलेले लोकोळी गावचे गुरव नावाचे गवंडी मेस्त्री यांचे बांधकाम सुरु आहे त्या ठिकाणी त्या सर्वांची जेवणाची व रहाण्याची व्यवस्था त्यानी केली आहे
सदर टेम्पो बुधवारी रात्री 11 वा गावातुन सुटला होता. सदर घटना ड्रायव्हर झोपेत असल्याने घडल्याचे समजते त्यावेळी वारकऱ्यांचे भजन सुरु होते, बेकवाड गावचे भाविक पंढरपुरला काल रात्री 11 वा पोहचले होते. सदर घटना त्यांना समजताच मनोहर पाटील भुत्तेवाडी,शंकर बाळेकुंद्री बेकवाड,शिवराम पाटील बेकवाड पांडुरंग पाटील बेकवाड,तुकाराम पाटील बेकवाड,यानी तात्काळ त्याठिकाणी धाव घेतली व त्याना लागलेली मदत करून जखमीना दवाखान्यात दाखल केले.