केनिया आर्मीचे कमांडर लेफ्टनंट जनरल वॉल्टर कोईपटॉन यांच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर आलेल्या लष्कराच्या पथकाने बेळगावच्या ज्युनियर लिडर्स विंगला भेट दिली.यावेळी जे एल विंगचे कमांडर मेजर जनरल अलोक काकेर यांनी त्यांचे स्वागत केले.
भेटी दरम्यान जे एल विंगमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती काकेर यांनी दिली.प्रशिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांची पाहणी केनिया लष्कराच्या पथकाने केली.तेथील प्रशिक्षकांशी चर्चा देखील केली.प्रशिक्षणाच्या सुविधा पाहून केनियन पथकाने समाधान व्यक्त केले.
केनियाच्या लष्कराचे पाच जणांचे पथक लेफ्टनंट जनरल वॉल्टर कोईपटॉन यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसाच्या बेळगाव भेटीवर आले आहे.भारतातील विविध ठिकाणी लष्कराच्या तळाना हे पथक भेट देऊन माहिती घेणार आहे.
2018 मध्ये भारतीय संरक्षण सचिवांच्या नेतृत्वाखाली केनियाला गेले होते.त्यावेळी लष्करी माहिती आदान प्रदान करण्याबाबत करार झाला होता.