जैन इंजिनियरिंग कॉलेजने फिट इंडिया मूव्हमेंट साठी एक अनोखी ऑफर विद्यार्थ्यांसाठी जाहीर केली आहे.कॉलेजला सायकल घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये इंसेंटिव्ह देण्याची घोषणा केली आहे.
सायकल आणणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये सायकल पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहे.विद्यार्थ्यांना सायकल क्लब स्थापन करण्यासाठी कॉलेजमध्ये आवश्यक ते सहकार्य करणार आहे.सायकल क्लब स्थापन करून त्या मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.सायकल चालवा आणि तंदुरुस्त राहा,प्रदूषण टाळा,इंधन वाचवा यासाठी विद्यार्थ्यांना सायकल वापरण्यासाठी कॉलेज व्यवस्थापन प्रोत्साहन देत आहे अशी माहिती जैन ग्रुपचे राध्येशाम हेडा यांनी दिली.
आज कल विद्यार्थी कॉलेजला जाण्यासाठी दुचाकींचा आग्रह पालकांकडे करत असतात या कॉलेजने सायकल आणणाऱ्या विद्यार्थ्यांना इंसेंटिव्ह देण्याची ऑफर देऊन केवळ पर्यावरण संरक्षण नव्हे तर आरोग्य संवर्धनासाठी देखील पाऊल उचलले आहे.
सायकल घेऊन कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी प्रशासक कर्नल डिसुझा यांच्याकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
चीन सायकल वापरणाऱ्यांची संख्या अधिक तिथं पर्यावरणाच्या बाबतीत सरकार जनता नेहमी जागरूक असते जर बेळगावात देखील सायकल वापरणाऱ्यांची संख्या वाढली तर पर्यावरण असो आरोग्यासाठी चांगलेच आहे अश्या उपक्रमाना सहकार्य करणे गरजेचे आहे.