जैन ग्रुप या शैक्षणिक संस्थेतर्फे जागतिक वाहतूक दिनानानिमित 17 नोव्हेम्बर रोजी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.वाहतूक सुरक्षा आणि सायकल चालवा हा सायक्लोथॉन आयोजनाचा उद्देश आहे.12 ते 19 वयोगटासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.तरुण वर्गात सायकल चालविण्या विषयी आणि वाहतूक नियमांचे पालन करणे याविषयी सायक्लोथॉनद्वारे जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.
देशातील प्रदूषण कमी व्हावे आणि जनतेचे आरोग्य चांगले राहावे हा सायकल चालवण्याविषयी जागरूकता निर्माण करण्या मागचा उद्देश आहे.
या इव्हेंट मध्ये ऑनलाइन आणि ऑफ लाईन अशी नोंदणी करू शकता या शिवाय स्पर्धे स्थळी देखील नावे नोंदणी केली जाऊ शकते सहभाग हा मोफत असेल.
या रॅलीत प्रत्येक सहभागी होणाऱ्यास प्रमाणपत्र तसेच आकर्षक बक्षिसे देखील दिली जातील.
सकाळी6:45ते 9:00 या वेळेत हा कार्यक्रम होणार असून सुरुवात आणि समाप्ती जैन हेरिटेज स्कुल पासून होणार आहे. 5 ते 13 नोव्हेंबर या काळात रहदारी नियमाची जनजागृती बाबत पथ नाथ आणि फलकांद्वारे जनजागृती केली जाणार आहे.