बेळगाव शहराचा विकास स्मार्ट सिटी होत असताना जर कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे बळी जात आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितावर मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या कारभाराबद्दल न्यायालयात खेचून त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्यानंतरच मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.
आयपीसी 304 ए – निष्काळजीपणाने मृत्यूला कारणीभूत असणारा जो कोणी दोषी किंवा निष्काळजीपणाने कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाल्यात संबंधित दोषी ठरतो. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयात जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करणे शक्य आहे. जर न्यायालयात हा गुन्हा शाबीत झाला तर संबंधितांना दोन वर्षाचा कारावास होऊ शकतो व कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याबाबत ही गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, असे एका जाणकार वकिलांनी सांगितले आहे.
महिन्याभरात स्मार्ट सिटी कामांमुळे दोघा जणांचा बळी गेला आहे. यामुळे यापुढे जर अशा घटना घडल्या तर संतप्त नागरिक थेट न्यायालयात जाऊन खुनाचा गुन्हा दाखल करणार असे सांगत आहेत. त्यामुळे यापुढे तरी कंत्राटदाराने शहाणे होण्याची गरज निर्माण झाली आहे व स्मार्ट सिटीच्या कामांना चालना देऊन ती तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी होऊ लागली आहे.
भादवि कलम 304 ए अन्वय जर न्यायालयात दोषारोप दाखल केल्यास आणि कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा साबीत झाल्यास न्यायालय त्याला शिक्षा देऊ शकतो. आता दोन्ही घटना ताज्या असताना अनेकांनी न्यायालयात जाण्याची संमती दर्शविली आहे. त्यामुळे यापुढे अशा भोंगळ कारभाराला आळा बसणार असून स्मार्ट सिटीची कामे तातडीने राबविण्यावर भर देण्यासाठी मनपाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.